Skip to main content

Posts

Showing posts from May, 2014

रोजच सकाळी हात जोडून...

रोजच सकाळी हात जोडून..., देवाला काहीतरी मागायची || गालावर हात फिरवून माझ्या..., बोटे तिच्याच डोक्यावरती मोडायची || •♥• Ek प्रियकर... •♥•

तुझ्या नि माझ्या वाटा....!!

तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर, एकत्रच चालतात खर तर,पण मिटत नाही अंतर, मनातला प्रत्येक क्षण ओठांवरती येईल का...? ओठांवरील प्रत्येक शब्द मनातच राहील का...? -mb •♥• Ek प्रियकर... •♥•

नाते "प्रेमाचे"

प्रत्येक नाते "प्रेमाचे" हवे, अशी काहीच गरज नसते. तर प्रत्येक नात्यात "प्रेम" असावे, याला खूप "महत्व" असते...... •♥• Ek प्रियकर... •♥•

काय ते प्रेम त्या शहरातल्या हिरोचं...

काय ते प्रेम त्या शहरातल्या हिरोचं... अन काय हे प्रेम आम्हा खेड्यातल्या पोरांचं.. त्याचं प्रेम म्हणजे त्याने तिला दिलेलं पहिल- वहिल ग्रेटिंग.. अन आमच हे पिरेम म्हंजी शेजारच्या बाळ्यान लावून दिलेली सेटिंग.. त्याचं ते प्रेम म्हणजे दोन पाखरांची गोड गुलाबी मजा.. अन आमच हे पिरेम म्हंजी साऱ्या गावभर झालेला गाजावाजा.. त्याचं ते प्रेम म्हणजे चौपाटीवाल्या फाईव्हस्टार मध्ये डेट.. अन आमच हे पिरेम म्हंजी गावच्या बंधाऱ्यावरची पाच मिनटाची भेट... पण त्याचं ते प्रेम म्हणजे चार दिवसात होणारा ब्रेकअप... अन आमच हे पिरेम म्हंजी आयुष्यभर चालणारा सेटअप... •♥• Ek प्रियकर... •♥•

तुझ्या येण्याची चाहुल

तुझ्या येण्याची चाहुल लागताच, वेडा निशीगंधपण आज बहरुन गेला...!! अन् कळीतुनी सुगंध प्रितीचा नवा , नकळत हळुहळू तो दरवळत चालला....!! •♥• Ek प्रियकर... •♥•

Red Rose

आयुष्यावर बोलू काही...!!

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही...! चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही...!! उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू, भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या, पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे, नकोनकोसे हळवे कातर बोलू काही उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतुन, परवा आहे उद्याच नंतर बोलू काही शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी, वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही... अप्रतीम गाण्... -mb • • Ek प्रियकर... • •

यश...!

यश मिळवायचं असेल, तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. शुभ सकाळ प्रेम पाखरांनो..... •♥• Ek प्रियकर... •♥•

हिल, हिल पोरी हिला, तुझ्या कप्पालीला टिला...!

हिल, हिल पोरी हिला, तुझ्या कप्पालीला टिला...! तुझ्या कप्पालीला टिला, ग फॅशन मराठी शोभेल तुला...!! आरं जा जा तू मुला, का सत्तावितंय मला...!! का सत्तावितंय मला, न जाऊन सांगेन मी बापाला...!! हिल, हिल पोरी हिला, तुझ्या कप्पालीला टिला... धाकू पाटलाची पोर मी बेरकी, अशी किती पोरं तुझ्यासारखी...!! आरं जेवण करायला, पाणी भरायला, ठेवीन घरकामाला...!! हिल, हिल पोरी हिला, तुझ्या कप्पालीला टिला... तुझी फॅशन अशी रे कशी, लांब कल्ले तोंडात मिशी...!! तू डोळ्यानं चकणा, दिसं नाही देखणा, चल जा हो बाजूला...!! हिल, हिल पोरी हिला, तुझ्या कप्पालीला टिला...!! तुझा पदर वार्याशी उडतो, अग बघून जीव धडधडतो...!! तुझी नखर्याची चाल, करी जीवाचं हाल, माझे गुल्लाबाचे फुला...!! हिल, हिल पोरी हिला, तुझ्या कप्पालीला टिला... •♥• ... •♥•
कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे ... !! !! शुभ रात्री !! • • Ek प्रियकर ...• •
त्याच्या सावळ्या वर्णा मुळे तिने त्याला नापसंद केलं.. तरी चोकलेट डे ला त्याने तिला सुंदर कव्हरच चोकलेट दिलं.. तिने जेव्हां उघडून पाहिलं तर ते रिकामच निघालं,,, मग तिने फोन करून त्याला विचारलं कां रे मला फसवलं..?? . . . . . . तो म्हणाला वरच्या रंगला भुलून, ज्याने जीवनाचा साथीदार ठरवला त्याने आत मध्ये काय आहे, हे पाहायचं तरी कशाला...!!!! • • ... • •

ताई....

ताई तुझ्यासाठी हसावं की रडावं... काही कळत नाही..., आपल्या नात्यासारख प्रेमळ... कोणतही नात जुळत नाही..., अन् तुझ्यासारख प्रेम... मात्र कोणाकडुन मीळत नाही...! Miss you Di... • • Ek प्रियकर ...• •
हसण्यासाठी मी आता एक कारण शोधत आहे... पुन्हा नव्याने जगण्यासाठी मी आता मरण शोधत आहे..

आई तुझ्या कुशीत झोपावस वाटतय. पण ऐकत नाही तु दुःख मनात दाटतय. क्षणभर झोपवुन मला, कुठे गेलीस काही कळत नाही. अग बघ ना ग..., बाबा पण मिळत नाही. आई मला मारलस, ओरडलीस तरी चालेल..., तेव्हाच तर मला मातृप्रेम कळेल. आई ग आता खुप झाला लंपडाव, आता तरी जवळ येना..., क्षणभर का होईना, मला तुझ्या कुशीत घेना... अरे देवा तु तरी सांग ना तिला यायला..., मला एखादाच गोड पापा घ्यायला..., अग आपल्या घरी लोक आलेत तुलाच शोधायला..., मामाच लग्न आहे ना, तरीही लोक रडतायेत... मार्गच नाही कळायला...? काय ग आई माझी आर्त हाक का तुला कळत नाही..., बघ ना रे देवा खुप शोधल, ती कुठेच मीळत नाही...!! अरे अजुन तर मला ''आई''... हा शब्दही उच्चारता येत नाही ताई तुझ पिल्लु तुलाच शोधतय ग....! •♥• Ek प्रियकर... •♥•

अरे बाबा दगडाचा आहेस..., किती दिवस दगडच राहशील..., कधी दुष्काळ, कधी अपघात..., तर कधी गारांचे चटके देशील..., अरे आता तरी जागशील का...!! अन् थोडा देवासारखा वागशील का...?? •♥• Ek प्रियकर... •♥•

माझी मैना गावावर राहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली......

माझी मैना गावावर राहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली || ओतीव बांधा | रंग गव्हाला | कोर चंद्राची | उदात्त गुणांची | मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची | हसून बोलायची | मंद चालायची | सुगंध केतकी | सतेज कांती | घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची | काडी दवन्याची | रेखीव भुवया | कमान जणू इन्द्रधनुची | हिरकणी हिरयाची | काठी आंधल्याची | तशी ती माझी गरीबाची | मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण | नसे सुखाला वाण | तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली | माझ्या जिवाची होतिया काहिली || गरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची | झाली तयारी माझी मुम्बैला जाण्याची | वेळ होती ती भल्या पहाटेची | बांधाबांध झाली भाकर तुकड्याची | घालवित निघाली मला माझी मैना चांदनी शुक्राची | गावदरिला येताच कली कोमेजली तिच्या मनाची | शिकस्त केलि मी तिला हसवण्याची | खैरात केली पत्रांची | वचनांची | दागिन्यांन मडवुन काडयाची | बोली केली शिंदेशाही तोड्याची | साज कोल्हापुरी | वज्रटिक | गल्यात माळ पुतल्याची | कानात गोखरे | पायात मासोल्या | दंडात इला आणि नाकात नथ सर्जाची | परी उमलली नाही कली तिच्या आन्तरिची | आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरिली