Skip to main content

Posts

Showing posts from May, 2016

सूर्य उद्याचा मीच असेल..

बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक  अभिनंदन  पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा... निकाल आजचा जरी फेल असेल... आकड्यांचा तो खेळ असेल... नसेल आज यशाचे किरण माझे... पण सूर्य उद्याचा मीच असेल...        © भावेश जनार्दन म्हसकर  ही संधी हुकलेल्या साठी ही शुभेच्छा... तयारी करा... नवी संधी तुमची वाट पाहतेय... :)

प्रेमानं जगण्याच्या, जगवण्याच्या कही गोष्टी...

प्रेमात पडल्यानंतर लक्षात ठेवण्याच्या १२ गोष्टी... लव्ह अँट फस्ट साईट असो, नाहीतर तिच्या प्रचंड नखर्‍यांनंतर आणि नकारांनंतर मिळालेला होकार असो.किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये अलगदपणेफुललेलं प्रेम असो.. आपण कशाप्रकारे प्रेमात पडतो हे महत्त्वाचं नाही; कारण प्रेमात पडणंतसं सोपं आहे; पण ते प्रेम निभावणं मात्र महाकठीण. एकमेकांना ‘पटवण्याच्या’ हजारो पद्धती तुम्हाला माहीत असतील; पण प्रेमात पडल्यानंतर ते प्रेम निभावणं. फुलवणं त्याचं काय...?  ते जमतं तुम्हाला...? की ज्या नात्यावर मनापासून प्रेम केलं तेच नातं जगण्यावर उदास सावली धरतं. तसं कुणाचंचं होऊ नये. म्हणून प्रेमात पडल्यानंतर लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी. प्रेमानं जगण्याच्या, जगवण्याच्या.... १) कुठलंही नातं विश्‍वासावर अवलंबून असतं. प्रेमात पडल्यानंतर त्या दोघांमध्ये विश्‍वासाचंएक नातं तयार होतं. पण निर्माण झालेला विश्‍वास टिकवणं मात्र गरजेचं असतं. तेव्हा एकमेकांपासून कुठलीही गोष्ट लपवू नका. नात्यातजितकी पारदर्शकता असेल तितकं तुमचं नातं तुम्हाला आनंद देईल. २) एकमेकांना कधीही गृहीत धरू नका. प्रेमात पडल्यानंतर होतं काय की समोरच्या म

एक ह्रदय...

Happy Mothers Day...

        पाणावलेले डोळे माझे... मी कित्येकदा तुझ्यापासून लपवले होते...         पाहताच चेहरा माझा...       तू अचूक ओळखले होते...            चूक असता माझी...          तू खुपदा मारल होत...            मग बसून जवळ...      मायेने मिठीत तू धरल होत...       प्रत्येक वेळी मायेने हात...        डोक्यातून फिरवायची...       शाळेत जाण्या आधीच...        बाराखडी गिरवायची...           मला काही होता...      तू वेड्यासारखी वागतेस...        उपाशी पोटी रात्रभर...      माझ्या उशाशी जागतेस...          तुझ्या साहवासात कित्येक...      बड़बड़ गीत आपण गायली होती...       अन् देवळतली प्रत्येक मुर्ती मी...       तेव्हाच तुझ्यात पाहिली होती...                 प्रत्येक क्षणी...           असावे सोबत आपण...            हीच एक मनी इच्छा...    मातृ दिनाच्या खुप खुप शुभेच्छा...                           ©भावेश जनार्दन म्हसकर                                  ९०२९५०८९०७