Skip to main content

Posts

Showing posts from July, 2014

पाऊस ...!!

#पाऊस आलो आहे आता मी.... आलो आहे आता मी, मनसोक्त भिजून घे, पुन्हा लिही कविता माझ्यावर, हातात ती लेखणी घे...! कोसळत्या सरींबरोबर, भाजक्या मक्याचा आस्वाद घे, छत्री दे भिरकावून, अन् हवं तेवढं बागडून घे...! चिखलातून चालताना, पँट थोडी सावरून घे, घरी पोहोचायला उशीर होईल, रेल्वेचं कोलमडणं सांभाळून घे...! पुन्हा मी निघून जाईन, हवं तेवढं ओंजळीत भरून घे, वर्षभर साठवून ठेवायचंय तूला, आज मात्र थोड्यावरंच भागवून घे...! -Ek प्रियकर www.ekpriyakar.blogspot.com

आलाआषाढ-श्रावण ...!

आलाआषाढ-श्रावण आल्या पावसाच्या सरी; किती चातकचोचीने प्यावा वर्षा‌ऋतू तरी...! काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यांत; काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत...! ओशाळला येथे यम वीज ओशाळली थोडी; धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोडी...! -Ek प्रियकर

आई...!

मुलगा म्हणाला, आई,दिव्याची वात मोठी कर...... मला वाचता येत नाही... वडिल म्हणाले , अगं दिव्याची वात कमी कर... मला झोप लागत नाही... आई रात्रभर, दिव्याची वात कमी जास्त करत राहिली आयुष्यभर दोघांनमध्येच, वातीसारखी जळत राहिली!!!!!!

तुझे सुंदर अन् निरागस डोळे ...!!

!!... तुझे सुंदर अन् निरागस डोळे ...!! मी तुझ्या मौनात माझे उत्तरे शोधून गेलो..., बोलले डोळे तुझे अन् सार मी जाणून गेलो..., बावल्या प्रश्नास होती , गोड ओठांची अपेक्षा..., मी तुझ्या डोळ्यात सारी अक्षरे वाचून गेलो... मोहिनी तव लोचनांची काय सांगावी तुला मी...? पापण्यांच्या आत तुझिया , मीच सामावून गेलो...! •♥• Ek प्रियकर... •♥•

मैत्री आनंदयात्रा...

#आनंदयात्रा चालताना वाटेत लागतो विसावा...! आयुष्याच्या संघर्षातही लागतो ओलावा...!! नात्यांच्या या गर्दीत कोण आपला नि कोण परका, मुखवट्या मागील जेव्हा कळतो खरा चेहरा, शरीरात रक्त नसेल तरी चालेल, पण आयुष्यात मैत्री ही हवीच...! कितीही जुनी झाली तरी, ती नेहमी वाटते नवीच...!!                     -Ek प्रियकर...

कसा बरसण्यासाठी आतुरलाय...!!

तो ढग बघ कसा बरसण्यासाठी आतुरलाय, तुझ्या चिंब गालावरुन ओघळला म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय, माझ्या शब्दांना अजुन तरी काहीच अर्थ नाही. जोपर्यंत त्या गीताला तुझ्या ओठांचा स्पर्श नाही. Mb •♥• Ek प्रियकर•♥•

मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत.

मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत...! मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत...!! दिवस रात्र २४ तास फक्त तिलाच पुजयाच असत, तिच्याच आठवणीने स्वताला विसरायच असत, कॉलेज रूम रास्ता यात फक्त तिला शोधयाच असत, अन देवाकडे फक्त तिच्या दर्शानाच साकड़ घलायाच असत, हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत, जळी तळी आभाळी अन आरश्यात तिचे प्रतिबिम्ब बघायच असत, बघता बघता तिला, आपण स्वताला हरवायच असत..., कधी चुकून नजर भिडली तर नजरेला खाली झुकवायाच असत, अन चोरून फक्त तिला एकटक बघत बसयाच असत, हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत, ती रोज स्वप्नात येते म्हणुन रोज सजुन लवकर झोपायच असत, अन स्वप्नात सुद्धा तिला फक्त बघून दुरून हसयाच असत, रोज सकाळी हातांच्या ओंजाळीत तिला पहयाच असत, देवाच्या आधी चुकून तिचेच नाव वदयाच असत, हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत, ती समोर नसतांना तिच्यावर सिंहा सारख काव्य म्हणयाच असत, ती वर्गात येताच मग सश्या सारख बेंच खाली लापयाच असत, आपण स्वत मुद्दाम चुकून आपल्या चुकान्वर तिला हसवायाच असत, ती हसताना