Skip to main content

Posts

Showing posts from February, 2015

मन जड झालय...!

मन जड झालंय, हलकं करावंस वाटतंय... चहुवार नजर फ़िरवली पण सगळेच खांदे कमजोर... कोण कुणाला आधार देणार...? कुणाच्या मनाला कोण उमजणार...? सगळेच जण आधार शोधतात... थोडेच जण मात्र आधार होतात....! -Ek प्रियकर

डोळ्यांचे काठ आसवाने भरतात सारखे...

डोळयांचे काठ आसवाने भरतात सारखे... वाटत आहे मजला रडावे सारखे...!! विचारपूस काय अनोळखीपण करतात... आज तूच विचारावे मजला वाटते सारखे...!! सोबतीला घेतले मी मजला काय हवे ते... तरी देखील पाय मागे का वळतात सारखे...!!                             -Ek प्रियकर

मन हे माझे..!

स्वच्छंद कधी उडणारे, स्वैर कधी बागडणारे, मन हे माझे…! प्रेम रंग रंगवणारे, बेधुंद कविता करणारे, मन हे माझे…!! -Ek प्रियकर

अजुन किती दिवस...?

मुखवटे  जगणाऱ्यांचीच, खरी मजा असते...! सरळसोट जगणाऱ्यानाच फासावरची सजा असते....! -Ek प्रियकर

आजन्म तुझी साथ राहावी...!

आजन्म तुझी साथ रहावी, तू प्रियसी माझी अन्.... मी तुझाच प्रियकर असावे...! प्रवास पुढचा होइल सूखकर, दोघे सोबत असताना, तुझ्या पावलावर पाउल मी टाकताना...! पुनार्जन्माचे नाव साजणी, कधीही न मी घ्यावे, जन्मोजन्मीचे सुख तुला मी, याच जन्मी द्यावे, याच जन्मी द्यावे !! -Ek प्रियकर

वाळलेल पान...!

वाळलेल पान झाडावरून पडल... तरी त्या पानाला भावना असतात...! पान झाल्याशिवाय कळणार नाही... त्या पानाला किती वेदना असतात....!! -Ek प्रियकर

एक प्रॉमिस...!

मी नेहमी तुला सुखात ठेवेन... एक क्षण सुद्धा माझ्यापासून दूर न करेन...! दिलेले प्रॉमिस जीवन भर निभावेन... अन् केलेले प्रेम जन्मभर जपेन....!! -Ek प्रियकर

मन माझे...!

कागद माझ्याकडे आहे... पेन ही माझ्याकडे आहे...! कागदावर काय लिहू... माझ मन तुझ्याकडे आहे...!!           -Ek प्रियकर

तु दिसती गुलाब सारखी....!

तु दिसती गुलाब सारखी... तुझा सुगंध दरवळतो...! पण मी एकच भोवरा आहे... जो तुला खूप आवडतो ...!! तू दिसती गुलाब सारखी... जेव्हा जेव्हा भेटतो तुला...! गुलाबाचा सुगंध... नेहमीच घेरतो माला...!! -Ek प्रियकर

मी फक्त प्रेम करत गेलो...!

तिच्या निरागस असण्यावर न भेटलल्या निष्पाप भावनांवर तिच्या माझ्यावरच्या विश्वासावर माझ्या निरागस स्पर्शाच्या तिच्या जाणीवेवर हातात हात देऊन स्तब्ध बसण्यावर न वेडा आहेस तू या बोलण्यावर ...!♥! -Ek प्रियकर