Skip to main content

Posts

Showing posts from April, 2015

प्रिय आम्हाला हा महाराष्ट्र माझा...!

सुजलाम, सुफलाम भूमी इथली, सुवर्ण झाली माती... जपली संस्कृती, जपली नाती, वाढवीली प्रगतीची गती... घामात भिजलेला महाराष्ट्र माझा.... प्रिय आम्हाला हा महाराष्ट्र माझा..... ---*---*---*---*---*---*---*---*---*---*---*---*---*---* भजनात दंगलेला महाराष्ट्र माझा... घामात भिजलेला महाराष्ट्र माझा... रंगात रंगलेला महाराष्ट्र माझा... प्रिय आम्हाला हा महाराष्ट्र माझा.....                              -Ek प्रियकर

।।...शाळेच्या आठवणी आणि मन माझ...।।

वाटे वरुण जाता शाळेच्या... जाग्या झाल्या जुन्या आठवणी... थांबली पाउले आणि शाळेचे दिवस आले ध्यानी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... गेलो थेट आत अन् सारच घेतल पाहून... आणि पुन्हा एकदा गेलो शाळेचाच होऊन... आठवल सार... समूह गीत प्राथना, पसायदान... अन् ओठावर आली मंजुळ गाणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी...!! केली पुन्हा एकदा तशीच मस्ती... केला थोडा दंगा... पण... ओरडणार नव्हतच कोणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... पहिला तोच वर्ग... अन् अनुभवाला पुन्हा एकदा स्वर्ग.... बसलो नेहमीच्याच जगी... पण शिकवणार नव्हतच कुणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी.... मग पुन्हा एकदा... बसाव वाटलं... त्याच कट्ट्यावर... अन् जागविल्या आठवणी... नकळत डोळ्यात आलं पाणी... अन् पुन्हा एकदा दाटून आल मनी.... आठवणींनी ताब घेतला होता मनावर... आले उन्हाचे कवडसे अन् आलो भानावर... एक विनंती... भेटून सारे जागवू शाळेच्या आठवणी... अन् ते क्षण सारे आनंदी साठवू मनी...!!                                       -Ek प्रियकर

सांग सखे तू माझी होशील का...?

उंच उंच आकाशात, चांदण्याच्या प्रकाशात गप्पांचा खेळ तू  खेळशील का...? बावरलेल्या डोळ्यांतून, पापण्यांच्या भाषेतून एकदातरी माझ्याशी तू बोलशील का...?                                        -Ek प्रियकर

तुझे डोळे...

स्वप्न जगण्याचे.. उंच उडण्याचे.. तुझ्यामुळे सारे.. क्षण स्वर्ग माझे.. आशेची किनार.. समृद्धिची ओटी.. चैतन्याच्या ज्योती तुझे डोळे.. तुझे डोळे..                                         -Ek प्रियकर

दोन थेंब अश्रुंचे...!

दोन थेंब अश्रुंचे गालावरती.. कसे पुसायाचे राहून गेले.. लपवलेले जे दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले... सांगितले बरेच काही.. आनंदाश्रु अन काही बाही.. अर्थ सुकल्या आसवाचा परी लावायचा तो लावून गेले.. लपवलेले जे दु:ख माझे... चार चेहरे पाहून गेले.. पुसले डोळे.. हसून खोटे चाचपले कितिक मुखवटे... मुखवट्याला चेहर्यावरती चढवायाचे आज राहून गेले... लपवलेले जे दु:ख माझे... चार चेहरे पाहून गेले.. हसून आता.. विसरून सारे वावरतो जणू.. उनाड वारे हसताना पुन्हा भरले डोळे... पापणीतून अश्रु वाहून गेले... लपवलेले जे दु:ख माझे.... चार चेहरे पाहून गेले... दोन थेंब अश्रुंचे गालावरती.. कसे पुसायाचे राहून गेले.. लपवलेले दु:ख माझे... चार चेहरे पाहून गेले... -Ek प्रियकर

स्पर्शिता तिने मी मुग्ध झालो...!

तिच्या शब्दातून मी आज जिवंत झालो, असण्यात माझ्या मी धन्य झालो... स्पर्शिता तिने मी मुग्ध झालो, दिवसापणी चांदण्यात नाहून गेलो....!                                  -Ek प्रियकर

आपल बोलण...!

आपल बोलणं नेहमीच अर्धवट राहत... मग मन माझ... पुनः पुन्हा त्या अल्लड क्षणांची वाट पाहत...                                                      -Ek प्रियकर...

वाचू पुस्तकाचे पान...!

(मोबईल मधेच व्यस्त असलेल्यांसाठी....) गुलाम झाली  दुनिया मोबाईलची ... त्यानेच केली खाली मान... समाजात मिळवु पुन्हा सन्मान... वाचू पुस्तकाचे पान...!!                      -Ek प्रियकर

धर्मं जातीचे नाव घेउनी, बॉम्ब फोडती पुन्हा पुन्हा...!!

नका उडवू झोप आमची, काय केला आम्ही गुन्हा धर्मं जातीचे नाव घेउनी, बॉम्ब फोडती पुन्हा पुन्हा..... मास बिघरते रक्त सांडते, मरतात इथे निष्पाप जीव आई वडीलान पासून मूल छिनते, पाहून येते त्यास कीव डोळ्यांमधून अश्रु वाहता, दुखाने होतो व्याकुळ जीव नेता येते पाहून जातो, जाहिर करतो पैसे पुन्हा..... असो हिंदू असो मुसलमान, या धर्तीचे लेकरे आपण धर्मं जातीचे नाव घेउनी,नेता साधतो आपली साधन निष्पाप जनता आगीत लपटते, नेत्यास मिळते त्याचे आसन नका लढू रे आपआपसात, आपल्याच हातून घडतोय गुन्हा..... आई मरते बाप मरतो, पोरके होते मूल तान्हे घर बनते स्मशान घाट, बिखरतात आयुष्याची सर्व पान या आगीत मरतात सारे, मरतात इथे हिंदू मुसलमान दहशतवाद्यास ठेचुन काढा, देऊ नका त्यास पन्हा..... हवा बुद्ध हवा येशु, नको आम्हास रक्त पिशासु शांत प्रिय देशास माझ्या, डोळ्यात येते रक्ताचे आसू निरागस जनतेच्या  चिंधड्या उड़ताच , दहशतवाद्यास येते हसू असा हां भयानक राक्षस, बॉम्ब फोडतो पुन्हा पुन्हा..... -Ek प्रियकर

आभार...!

तुमच्या शुभेछांनी मन भरून आल... एक साधारण दिवस... त्याला तुम्ही वैविध्य पूर्ण केल... तुमच्या शुभेछ्याची... वर्णी खरच अतुलनीय आहे. माझा प्रत्येक वाढदिवस... माझ्यासाठीच नवीन आहे.... असीच राहो साथ तुमची निरंतर... कधीच न येवो... आपल्या मैत्रीत अंतर...!

प्रेमाची फुले...!!

कोण ग तू कुठून आलीस...? मनावर माझ्या राज्य करून गेलीस...! येताना प्रेमाची फुले होती आणलीस...! जाताना विरहाचे काटे तेवढे दिलेस....!! तेच काटे आता मला सतत टोचतायत...! शिल्लक राहिलेला प्राण जणू शेवटची घटका मोजतायत....!!                          -Ek प्रियकर

आरशात पाहताना वाटतं....!

आरशात पहाताना वाटतं... आता मी मलाच दिसणार नाही...! निरखुन पहायचे त्याला अन् तोही मला तरीही... आरशाला मी खरी कळलेच नाही..!!                                     -Ek प्रियकर