Skip to main content

Posts

Showing posts from October, 2014

कितनी जल्दी ये मुलाक़ात गुज़र जाती है...!

कितनी जल्दी ये मुलाक़ात गुज़र जाती है...! प्यास भुजती नही बरसात गुज़र जाती है...! अपनी यादों से कह दो कि यहाँ न आया करे, नींद आती नही और रात गुज़र जाती है...! •♥• Ek प्रियकर... •♥• 24/11/13

खरंच ती … ती फार …. सुंदर दिसत होती …!

पाण्याने भिजलेली … थंडी ने शहारलेली … विजांच्या कडकडाटाने घाबरलेली … पावसाच्या थेंबांनी नटलेली … ओलाव्याने सजलेली … छत्रीत लपलेली … चिखलावर थोडीशी रागावलेली … पण वार्याने सुखावलेली… दगडा दगडावर पाय टाकत चाललेली … स्वतः ची स्वतःच सावरलेली … खोटी खोटी रुसलेली … थोडीशी लाजलेली … माझ्याशी हसलेली … जोराच्या पावसात …. काळ्या ढगांच्या काळोखात … छत्र्यांच्या गर्दीत …. खरंच ती … ती फार …. सुंदर दिसत होती … -Ek प्रियकर 1/08/2014

ताई तुझ्या लग्नानंतरची ही पहीली दिवाळी...!

आज दारात दिवा तर आहे, 'पण'ती तु लावलेली नाही...! दारात रांगोळी तर आहे, पण तुझ्याईतकी सुबक, जमलीच नाही...! दिवाळी तर आहे, पण ताई यंदा तो उत्साह नाही...! Miss u... <3 -Ek प्रियकर

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!

अमावस्येच्या अंधारात, दिव्यांना आज प्रकाशित करा...! तुम्हीही असेच तेजोमय व्हा, आणि संकटावर मात करा...!! -Ek प्रियकर प्रियकर आणि परिवारा तर्फे दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!

बाळासाहेबांना भावपुर्ण श्रधाजंली

उसवुन गेले श्वास अन फसवून गेल्या राती मातोश्रीच्या भुकंपाने भेगाळली ही छाती देवा सावधान, बाळ नावाचा बाप येतोय.. स्वर्गाचा रंग भगवाच.. साहेब मुजरा ;-(बाळासाहेबांना भावपुर्ण श्रधाजंली;-( -Ek प्रियकर 17/11/2012

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. . . .

प्रत्येक शब्दाने तुझ्या, मैफ़लीचे गीत व्हावे, सूर तुझ्या मैफ़लीचे, दूर दूर जावे, तुजपुढे ठेंगणे व्हावे, त्या उंच अंबराने, साथ तुझी द्यावी, यशाच्या प्रत्येक शिखराने, बागडावे तू, नभी उंच उडावे तू, बनुन मोती सुंदरसा, शिंपल्यात पडावे तू, प्रत्येक क्षणाला, पडावी तुझी भुल, खुलावेस तू सदा, बनुन हसरेसे फ़ुल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. . . . -Ek प्रियकर 24/11/2012

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

फुलासारखा सजुन येतो, हा दिवस तुझ्यासाठी...! अंतरंगी रूजुन येतो, हा दिवस तुझ्यासाठी...! आनंदाचे मेघ दाटुन येतात, अन् आभाळ गाऊ लागतं...! आपल्याच मस्तीत दंग होऊन, सार रान न्हाउ लागतं...! या दिवसाची हाक गेली, दुर सागरावरती...! अन् आज किनारी आली, शुभेच्छाची भरती...! -Ek प्रियकर

काही क्षणांची भेट अन् नजरेला नजर...!

नाही म्हणालीस तरी उद्या मी येणार, काही क्षणांची भेट अन् नजरेला नजर भिडणार...! क्षणांर्धातच सुखावलेल्या क्षणांनी मी मागे फिरणार, घाबरू नको सये तुझा वेळ वाया नाही जाणार...!! -Ek प्रियकर

एक भेट हवी आहे....!

उद्या दिवस तुझा असणार आहे... तरीही मी तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे. कदाचीत तुझ्याकडे नसेलही पण, तरीही मला तुझी वेळ हवी आहे. एक भेट हवी आहे. तासभर नको, एक मीनीट भरही चालेल अगदीच काही क्षणांची एक भेट.... देशील ना सये एक अमुल्य गोष्ट फक्त काही क्षण उद्याच्या दिवसाचे....तुझ्या आयुष्यातले....! मी वाट पाहीन अगदी नेहमीसारखी.... -तुझाच प्रेमवेडा प्रियकर

माझ्या जिवणाला कुणी आता ओळखावे...!

माझ्या जिवणाला कुणी आता ओळखावे, माझ्या हसण्याला कुणीतरी समजावे, माझ्या जिवणाचे कुणीतरी गीत गावे, माझ्या आयुष्याला आता वेगळाच रंग यावा, माझ्या भावनांचा अर्थ कुणी समजावा, माझ्या अश्रुनांही आता मोल यावे, आयुष्यात माझ्या आता काही तरी व्हावे, जगही लाजेल असे आता घडावे, माझे जिवणगाणे मीच आता आळवावे, प्रेमाची आशा न करता मीच प्रेम व्हावे मैत्रीतही मीच आता केंद्रबिंदु व्हावे, मी काय व्हावे ? मी कोण व्हावे ? मीच माझे स्वप्न व्हावे... मीच माझे स्वप्न व्हावे... -Ek प्रियकर

मी असाच आहे...!

मी असाच आहे, एकटा एकटा जगणारा.... वाऱ्याबरोबर दुर फिरायला जाणारा, हिरव्या सावलीत कोठेतरी रमलेला असाच आहे मी... कवितेतल्या चारओळीत कोठेतरी हरवलेला".... -Ek प्रियकर

तू येणार नाही...!

तू येणार नाही हे माहित असताना, तुझी वाट बघण्यात एक वेगळी मज्जा आहे, मीच मला देलीली हि एक आवडती सजा आहे...! -Ek प्रियकर

विरहाच्या या क्षणांना...!

विरहाच्या या क्षणांना रुसण्याचे बंधन कशाला, एकाकी या जीवाला जगण्याचे कुंपण कशाला...! लाजेच्या त्या लालीत मला एकदा भिजवून जा, एकदाच तुझ्या आलिंगनाने मुक्त मला करून जा...! -Ek प्रियकर

फक्त हसावस तू, माझ्या हृदयात बसावस तू...!

फक्त हसावस तू, माझ्या हृदयात बसावस तू...! मी हाक मारली तर, माझ्याजवळ असावस तू...!! फक्त आठवावं तूला, डोळ्यात साठवावं तुला...! रुसून कधी बसलीसच, तर मनवाव तुला...!! -Ek प्रियकर

खूप दिवसांनंतर आज तुझा आवाज ऐकला...!

खूप दिवसांनंतर आज तुझा आवाज ऐकला, तो गोड आवाज ऐकुन श्वासही क्षणभर थांबला, मनातील विचारांचा जमाव थोडासा पांगला, तुझ्याशी बोलताना वाटलं, एकटेपणा संपला.! तोच आवाज, तिच वाक्य, तिच बोलण्याची शैली, जशी वेगवेगळ्या रत्नांनी भरलेली थैली, वाटलं असंच तु बोलत रहावंस, माझ्या कानांत गोड हसत रहावंस.! तुलाही कदाचित वाटलं असेल पण घरच्यांपुढे कदाचित जमलं नसेल, मनात नसताना फोन ठेवला असेल, अजुन बोलण्याची ईच्छा मनी नक्कीच असेल.! वाट पाहिन मी तुझी, तुझ्या गोड आवाजाची, आठवण मला नेहमीच राहिल या क्षणांची, का देऊ मी उपमा याला इतर कशाची, माहितच आहे तुला अवस्था माझ्या मनाची.! इच्छा झाली होती काहीतरी विचारायची, तुलाही आवड होती काहीतरी ऐकायची, पण ओठांमध्ये शक्ती नव्हती बोलायची, मनालाही आवड नव्हती अग्निपरीक्षेची.! -Ek प्रियकर

जिथे 'तु' नाहीस तिथे 'मी' कसा असणार...!

कसा येणार तुझ्या स्वप्नात मी... जेंव्हा हल्ली तु स्वतः स्वतःच्या स्वप्नांत नसतेस... जिथे 'तु' नाहीस तिथे 'मी' कसा असणार... कारण दिवस रात्र तर तु आजकाल माझ्याच स्वप्नांत बागडत असतेस... -Ek प्रियकर

कुणासाठी कुणीतरी.... 2

कुणासाठी कुणीतरी.... आयुष्यात 'जगतात', भाव-भावनांना जाणून , आपली 'मैत्री' टिकवीत असतात. कुणासाठी कुणीतरी.... आयुष्यात 'मरतात', नाते संबंधांना बळी पडून, आपली 'प्रीती' दर्शवित असतात.

तु माझ्या अयुष्यात...!

तु माझ्या अयुष्यात नवी पहाट बनुन आलीस, भर उन्हात मला चींब भीजवुन गेलीस....♥ आता अशी माझ्यापासुन दुर तु जावु नकोस, पंख नसलेल्या पाखराचा खेळ पाहू नकोस...♥ -Ek प्रियकर

तू आणि मी...!

तू आणि मी एक प्रेमळ नाते, प्रत्येक क्षणी उलगडत जाणारे....! तू आणि मी शांतते मधले शब्द, न बोलता हि खूप काही सांगणारे....! तू आणि मी समुद्राचे दोन किनारे, कधी हि भेटू न शकणारे पण, एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे.....! -Ek प्रियकर

तुला माझ्या कुशीत शांत निजता यावं...!

मी ही आपला वेडाच... तुला माझ्या कुशीत शांत निजता यावं म्हणून रात्र रात्र जागून काढतो... डोळे मिटले चुकून माझे तर तु हरवशील कुठेतरी या भीतीने स्वप्न देखील मी आजकाल 'उघड्या डोळ्याने'च पाहतो... -Ek प्रियकर

मी आपला वेडाच...

मी ही आपला वेडाच... तुला माझ्या कुशीत शांत निजता यावं म्हणून रात्र रात्र जागून काढतो... डोळे मिटले चुकून माझे तर तु हरवशील कुठेतरी... या भीतीने स्वप्न देखील मी आजकाल 'उघड्या डोळ्याने'च पाहतो... -Ek प्रियकर

मन भिजले भिजले सवे भिजला पाउस...!

मन भिजले भिजले सवे भिजला पाउस, रात सांगे पावसाला नको एकला गाउस...! तिथं छेडलीस तार इथं मीही बिथरले, एक घाव त्या सुराचा माझ्या हृदयात उरे...!! -Ek प्रियकर

खूप सुंदर आहेस तू...!

खूप सुंदर आहेस तू, गुलाबच्या फुला मधील नाजूक कळी आहेस तू, म्हणून एवढा भाव खात असशील तर... शेवटी माझीच होणारी अर्धांगिनी आहेस तू .......! -Ek प्रियकर

तुझ्यासाठी प्रत्येकवेळी मन वेडे रडलंय...!

तुझ्यासाठी प्रत्येकवेळी मन वेडे रडलंय, पण आता त्या आभासमय पाखराला त्याच्या क्षितीजावर सोडलय, पावलांच्या उगीच बहकन्याला कधीच सावरलय, वेड्या माझ्या मनालाही तेव्हाच आवरलंय...!!! Ek प्रियकर...

कुणासाठी कुणीतरी...!

कुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत.... संपल्या वाटेवरही आस ठेऊन जगत असत... कुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत.... हसताना उगाचच लपून डोळे पुसत असत...

तुझ्यावर काव्य करता करता...!

तुझ्यावर काव्य करता करता कविता झाली, कविता करता करता ती एक चारोळी झाली, ती चारोळी वाचून मला हि कळले नाही, कि ''तू माझी'' केव्हा झाली.......... -Ek प्रियकर

माझी चुक नको शिंक्षा तर सांगुन जा.....

जाता जाता या वेड्यावर एक उपकार करशिल का, मला तुला काही सांगायच हे एकदाच मला भेटशील का, फक्त..... फक्त एकदाच भेटून जा, मला माझी चुक नको शिंक्षा तर सांगुन जा..... -Ek प्रियकर

अश्रु मनात दाटतात....!

सोनेरी क्षणाच्या या सणाला, म्हणे सोन वाटतात.... आपली माणस नाहीत आपले सोबती या क्षणांचे, या कल्पनेतच अश्रु मनात दाटतात.... -Ek प्रियकर