Skip to main content

Posts

Showing posts from March, 2016

रंग प्रेमाचा....

फक्त रंग लावायचा असता... तर मी तुला कधीच रंगवाली असती... मला तर तुझ कपाळ रंगवायच आहे... तेही फ़क्त लाल रंगाच्या एका टिपक्याने... #टिळा_होळी  Happy रंग पंचमी... - Ek प्रियकर

ओलांडून बंधनांचा उंबरा पुढे तू जायला हवे...

८ मार्च जागतिक महिला दिन निमित्त  "भावेश जनार्दन म्हसकर" (Ek प्रियकर) ची ही  शब्द सुमने सगळ्या महिला वर्गास समर्पित... तुझ्या स्वप्नांना बळ, आता तूच द्यायला हवे... ओलांडून बंधनांचा उंबरा पुढे तू जायला हवे... ॥ ध्रु ॥ मदतीचा हात देणारे असतील कमी.. अन् पाय खेचणारेच मिळतील जास्त... त्यांचे मनसूबे तू ठेचुन काढायला हवे... कुणाच्या साथीने अथवा एकटिने आता तू पुढे व्हायला हवे ॥१॥ पुन्हा एकदा एखादया सुनीताने जन्म घ्यायला हवे... बलात्कार करणाऱ्या नाराधमाला... कठोर शिक्षा तूच करायला हवे...   ॥२॥ सरस्वती च्या सोबतीने... तूला माहाकली चे रूपही घ्यायला हवे... अन् तुला अडवणाऱ्या वृत्तिला तूच छाटायला हवे... ॥३॥ तुझ्या पवित्र्याच प्रमाणपत्र मागणाऱ्या रामाला... आजची सीता होऊन तुही जाब विचारयला हवे... अन् पवित्र बंधनात अडकल्यावर मात्र... राधा कृष्णा सारखे जागायल हवे... ॥४॥ जपून परंपरा... मोडून जुनाट बंधने... फुलबरोबर कळीलाही तुला जपायला हवे... झाशीची राणी म्हणून जगताना... शिवबाही तू घडवायला हवे... अन् जगताना आजच्या घड