Skip to main content

Posts

Showing posts from September, 2014

वेळ ही आली निरोपाची...!

वेळ ही आली निरोपाची, सये आता तरी ये... एकदा का होईना, या विरहवेड्याला मीठीत घे... खुप दिवस झाले, तुझा निरोप नाही की भेट नाही... निदान मीटताना डोळे, तुला डोळे भरून पाहु दे...... सये सगळी तयारीही झाली, चार लोकलीही जमलेत.... तु येनार भाबड्या आशेवर, तेही थांबलेत.... आपली संस्कृती, महीलांना परवाणगी देत नाही... तरीही वेळ काढुन तु ये, अन् जळणार्या चितेस माझ्या पुन्हा अग्नी दे..... -Ek प्रियकर 01/10/2014

तुझ्याशिवाय अधुरा माझा खेळ आहे...!

होशील का तू प्रिये माझी...! आज पुन्हा जगण्याचं वेड आहे, आज पुन्हा लढण्याचं बळ आहे, नको जाऊ मध्येच सोडुन, तुझ्याशिवाय अधुरा माझा खेळ आहे... -Ek प्रियकर

बस ना ग हा खेळ लपंडावचा...!

बस झालं ना ग हा खेळ लपंडावचा... मिळत असेल आनंद तुला लपण्यात.....! पण मीच आता हरवलो तुला शोधण्यात... बस झालं ना ग हा खेळ लपंडावचा....! काही मार्गच नाही तुझ्यापर्यत पोहोचण्याचा... तू फक्त एकदा भेट...., संधी देणारच नाही तुला.. परत लपण्याचा...! बस झालं ना ग हा खेळ लपंडावचा....! -Ek प्रियकर

तुझ्या आठवणीत...!!

तुझ्या आठवणीत रात्र-रात्र जागावसं वाटतं, तुझ्या आठवणीत क्षण-क्षण रडत बसावसं वाटतं...! तुझ्या आठवणीत तुझ्याचंसाठी जगतोय, हे ओरडून- ओरडून सांगावसं, तुझ्या आठवणीत एकदा का होईना खोटं-खोटं मरावसं ... वाटतं...!! -Ek प्रियकर

पण जगायचे राहून गेले..........!

ठरवले..... नाही पहायच तिथे ... नाही राहीले, पहायचे तिथे....! ठरवले सारे विसरूनी जगायचे... काहीच विसरलो नाही....! पण जगायचे राहून गेले..........! -Ek प्रियकर

तु माझ्या अयुष्यात...!

तु माझ्या अयुष्यात नवी पहाट बनुन आलीस, भर उन्हात मला चींब भीजवुन गेलीस....♥ आता अशी माझ्यापासुन दुर तु जावु नकोस, पंख नसलेल्या पाखराचा खेळ पाहू नकोस...♥ -Ek प्रियकर Facebook.com/mb.sathtuzi

मी आपल्या लोकांत.... रम्य जीवन जगतो ...!

लोकं रुप बघतात, मी मन बघतो... लोकं विचार करतात, मी कृती करतो.... लोकं Prictical जगतात, ... ... मी स्वप्नात रमतो.... लोकं आणि माझ्यात, फरक ईतकाचं.... लोकं आयुष्यभर, कोणी आपलं आहे.... का याचा शोध घेतात, मी आपल्या लोकांत.... क्षणा क्षणात असलेले, रम्य जीवन जगतो ...! -Ek प्रियकर

का कुणास ठाऊक..... झालय काय आज.........!

का कुणास ठाऊक..... झालय काय आज.........! दाटून आलय खुप, पण शब्दात मांडता येत नाही....! सये खुप साठलय उरात, पण तुझ्याशी भांडताही येत नाही....! -Ek प्रियकर

आता फक्त मरावस... वाटतंय...!

तुझ्यावर खुप प्रेम करावेसे वाटतंय, खुप दिवस गेले तुझ्या आठवणीत, आता तुला पाहावेसे वाटतंय... तुझ्या प्रेमात मन गुंतवुन द्यावेसे वाटतय, अगदि खरं सांगतो.... तुझ्याशिवाय जगु शकत नाहि आता फक्त मरावस... वाटतंय... Miss u

काही क्षणांचे सोबती आता...!

"माझे श्वास मिटण्याआधी, एकदा येऊन भेटून जा.... गळून पडलेल शरीर माझ, एकदा अंगाशी लपेटून जा.... माझ्यातल्या तुझ्या आठवणींना, एकदा येऊन समेटून जा.... श्वास माझे मिटण्याआधी, फ़क्त एकदा येऊन भेटून जा" फ़क्त एकदा येऊन भेटून जा" काही क्षणांचे सोबती आता -Ek प्रियकर facebook.com/mb.sathtuzi

तुझ हास्य ...!

तुझ हास्य उधार मागायचय....... थोडस हसायचय.....थोड जपायचय....... पिल्लु हसशील ना..... फक्त थोडसच..... माझ्यासाठी.... उरलेल्या क्षणांसाठी....... -Ek प्रियकर facebook.com/mb.sathtuzi
तुझ हास्य उधार मागायचय....... थोडस हसायचय.....थोड जपायचय....... पिल्लु हसशील ना..... फक्त थोडसच..... माझ्यासाठी.... उरलेल्या क्षणांसाठी....... -Ek प्रियकर facebook.com/mb.sathtuzi

अश्रुंच्या थेंबानी जे लिहील आहे...!

वाळूवरच तुझ नाव लाटांनी येऊन पुसल, माझ्या मनावरच त्यांना कस पुसता येईल, अश्रुंच्या थेंबानी जे लिहील आहे, ते सहज कस कोणाला वाचता येईल....! -Ek प्रियकर

मन माझं....!

माझं मन हि हल्ली, माझ्यासारख वागत, रात्रभर माझ्यासोबत ते हि, वेड्यासारख जागत...! -Ek प्रियकर

उरलेल्या रात्री मी जागवू कितीदा...?

जिंकावयास डाव राहिले कुठे, आता सांग मला, हरलेले डाव मी खेळू कितीदा? डोळे उघडून पाहण्या राहिले काय, सांग मला मिटून डोळे तुला मी पाहू कितीदा...? संपत नाही दिवस माझा, येतही नाही रात्र... सांग मला उरलेल्या रात्री मी जागवू कितीदा...? -Ek प्रियकर

बहिणी माझ्या...!

मायेची छाया, प्रेमळ काया, सर्वांच्या लाडक्या, बहिणी माझ्या...! निर्मळ मनाच्या, सुंदर स्वभावाच्या, आपुलकीने वागतात, बहिणी माझ्या...! -Ek प्रियकर

तू माझी बहिण मी तुझा भाऊ...!

तू माझी बहिण मी तुझा भाऊ, प्रेमाचं हे नातं असंच अतूट ठेवू...!! तुझी माया तुझं प्रेम निरंतर असं राहो, प्रेमाचं हे नातं असंच दृढ होवो...!! -Ek प्रियकर

आले डोळे भरुनी का हो घेता निरोप...!

आले डोळे भरुनी का हो घेता निरोप, मला सोडूनी निघाला माझा माय बाप, देव चिंतामणी किती आठवू रूप, वेड लावूनी का हो घेता निरोप..... ॥गणपती बप्पा मोरया॥ पुढच्या वर्षी लवकर या..........

ते खरे प्रेम होते माझे...!

माझ्या भावना समजायला, तुला कधीचं वेळ नव्हता.. ते खरे प्रेम होते माझे, तो भातुकलीचा खेळ नव्हता.. मध्येचं अर्ध्यावर सोडून जाताना, एकदा तु विचार करायला हवा होता.. तुझ्यासाठी जुनं असेल ग हे सगळं, माझ्यासाठी तर हा नवा खेळ होता.... -Ek प्रियकर

आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे....!

आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि....., प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे..... आणि ............. तुझ्यात इतके स्वत:ला सामावायचे आहे कि....., आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे....... -Ek प्रियकर...

इतरांना समजवताना …!

इतरांना समजवताना … माझ मन , माझे शब्द … पूर्ण भरात असतात, पण मी एकटा असताना मात्र… माझेच शब्द, माझेच मन… जणू माझ्याच विरोधात असतात. -Ek प्रियकर

वाट पाहतोय...!

वाट पाहतोय अल्लड क्षणांची, स्वप्नातल्या तुझ्या सोबतीची, न उमगलेल्या अनामिक नात्याची, भूरळ पडणाऱ्या त्या हास्याची...! वाट पाहतोय तुझ्यात हरवून जाण्याची, मिठीत तुझ्या सहज विरून जाण्याची, निवांत तुझ्या कुशीत निजण्याची, नितांत बडबडनारे होठ पाहण्यची...! वाट पाहतोय माझी होण्याची, हळुवार पाऊलांनी तुझ्या येण्याची, अनामिक्तेला एक नाव देण्याची, फक्त तुझाच होऊन जाण्यची...! -Ek प्रियकर

एकटा असा हा गर्दीत मी...!

दाटून आला उर , आता स्वर ओठातून फुटत नाही. कान हे आतुरले तुझ्या शब्दांसाठी , पण साद तुझा ऐकू येत नाही...! एकटा असा हा गर्दीत मी , विरह हा सहन होत नाही. ओलावल्या ह्या पापण्या , आता अश्रू गालावरुनी ओघळत नाही...! -Ek प्रियकर

आज पुन्हा आपल्यातला दुरावा जाणवला...!

आज पुन्हा वेदनांच वादळ सुटलयं, सोबत भावनेचा धुराळाही उडाला, पुन्हा या मनाच ते स्वप्न कुठतरी भटकलयं, समजाऊन दमलोय या वेड्या मनाला.., आज पुन्हा आपल्यातला दुरावा जाणवला... पुन्हा सतावती मला तुझ्या आठवणी, पुन्हा त्या न संपणा-या रात्री, बघ आलय आता या डोळ्यात पाणी, आज पुन्हा तो वेदनेचा पाऊस बरसला, आज पुन्हा आपल्यातला दुरावा जाणवला.... -Ek प्रियकर

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय...!

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय, स्वत:पासून हरवत गेलोय, तुझंच स्मरण असते फक्त, सगळं काही विसरत गेलोय...! जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय, मन तुझ्याचभोवती फिरते आहे, आकाशाकडे पाहत रात्री, स्वत:शीच उसासे भरते आहे...! जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय, जीवन सुंदर झालाय, माझं तुझ्या प्रेमाच्या वर्षावात, मन चिंब चिंब न्हालंय ...! जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय, आयुष्याचे अर्थ कळाले, तुझ्या रूपानेच मला गं, प्रेमरूपी दैवत मिळाले...!! -Ek प्रियकर

माझ्या जिवणाला कुणी आता ओळखावे...!

माझ्या जिवणाला कुणी आता ओळखावे, माझ्या हसण्याला कुणीतरी समजावे, माझ्या जिवणाचे कुणीतरी गीत गावे, माझ्या आयुष्याला आता वेगळाच रंग यावा, माझ्या भावनांचा अर्थ कुणी समजावा, माझ्या अश्रुनांही आता मोल यावे, आयुष्यात माझ्या आता काही तरी व्हावे, जगही लाजेल असे आता घडावे, माझे जिवणगाणे मीच आता आळवावे, प्रेमाची आशा न करता मीच प्रेम व्हावे, मैत्रीतही मीच आता केंद्रबिंदु व्हावे, मी काय व्हावे ? मी कोण व्हावे ? मीच माझे स्वप्न व्हावे... मीच माझे स्वप्न व्हावे... -Ek प्रियकर