Skip to main content

Posts

Showing posts from May, 2015

दोष तुझा नाहीच म्हणा....!

दोष तुझाही नाहीच म्हणा... तू आहेस परिस्थितीची गुलाम...! माझ्याच मनावर योग्यवेळी मी... घालायला हवा होता लगाम...!!                               -Ek प्रियकर

कितीही समजावले...!

मिळालं की गमावलं... मला नाही काही कळत...! कितीही समजावले तरी मन... प्रेमाच्या विरोधात नाही वळत...!!                        -Ek प्रियकर

नाते प्रेमाचे...!

प्रत्येक नाते "प्रेमाचे" हवे, अशी काहीच गरज नसते...   तर प्रत्येक नात्यात "प्रेम" असावे, याला खूप "महत्व" असते......                        -Ek प्रियकर

शिकवं थोडं मलाही...!

शिकवं थोडं मलाही... प्रेम व्यक्त करावं कसं...! अबोल राहूनही... डोळ्यांनी बोलावं कसं...!! गुंतूनही मनानं. गुंतणार नाही सांगाव कसं...! न पाठ फिरल्यावर... साद घालावं कसं...!! फक्त एका कटाक्षान... वेड लावावं कसं...! हळूच गोड हसून... मनास फसवाव कसं...!! न बोलता कुणाच... हृदय जिंकाव कसं...! चोर पावलांनी... हृदयात शिराव कसं...!! कुणाला वेड लावून... त्यास झुरवाव कसं...! कुणी प्रेमात डुंबल्यावर... आयुष्यातून निघाव कसं...!!                    -Ek प्रियकर www.ekpriyakar.blogspot.com

भास तुझ्या प्रेमाचा...!

ज्ञात आहे मज डाव हा फासण्याचा...! पण आनंद देतो भास तुझ्या प्रेमाचा...!!                            -Ek प्रियकर

तरीही लोक म्हणती... 'मेरा भारत महान'...!

राधा-कृष्णाच प्रेम महान गाती लोक याचंच गुणगान आज पण येथे प्रेमच बदनाम... तरीही लोक म्हणती 'मेरा भारत महान'... विद्यार्थ्यांना शिक्षक हैरान... शिक्षण वीकल जात खुलेआम तरीही शिक्षकच होई बदनाम... तरीही लोक म्हणती 'मेरा भारत महान'... दहा दहा रूपयाला विकला जातो ईमान नेताच करतो.. नितिचा अपमान... तरीही लोक म्हणती 'मेरा भारत महान'... 'जय जवान जय किसान'... विसरले सारेच नारा महान कर्ज गरीबीला त्रासुन.. शेतकरी देती बलिदान.. तरीही लोक म्हणती 'मेरा भारत महान'... वाढतो आहे हळू हळू प्रत्येकात शैतान... भांडतात भाऊ भाऊ.. बनुन हिंदु मुसलमान... तरीही लोक म्हणती 'मेरा भारत महान'... पोटात भूक भकरीची.. आणि ओठावर पाण्याची तहान बेबस लाचार जनता... जगते मुठीत घेऊन प्राण तरीही लोक म्हणती 'मेरा भारत महान'... -Ek प्रियकर www.ekpriyakar.blogspot.com

आठवणीना आला पुर...!

अंधार वाढत गेला... आठवणीना आला पूर...! येतील का परत... ते क्षण... सोडून गेलेले दूर...!!                  -Ek प्रियकर

मी आहेच असा...!

मी आहेच असा, एकट एकटा जगणारा...! सर्वांत असुनही, स्वतःच्याच शोधात फिरणारा...!! मी आहेच असा, जीवानाच मर्म जाणणारा...! मैत्रीच्या नात्यातच, आपला धर्म मानाणारा..!! मी आहेच असा, दुखाःतही नेहमी हसणारा...! अन हसता हसता नियतीला लाजवणारा..!! मी आहेच असा, जरा प्रेमाने बोलणारा.... आपल्या सरळ वागण्याणे, कुणालाही सहज आपलसं करणारा..!! मी आहेच असा, सतत प्रकाश वाटणारा...! पण स्वतः मात्र, नेहमीच धडपडणारा..!! मी आहेच असा, सगळ्यांपासुन दुर जाणारा...! जाता जाता साऱ्यांच्या मनात घर एक करुन राहणारा..!!           -Ek प्रियकर

आठवणीच्या हिंदोळ्यावर...!

आठवणीच्या हिंदोळ्यावर... तुझे माझे भेटणे...! एकांती पावूल वाटेवर... तुझ्या आठवणीतच माझे चालणे...!!                        -Ek प्रियकर

दुःख एवढच...!

दुःखं एवढच... आता तुला पडला आहे माझा विसर अन् फुटले आहेत पंख 'माझ्या पाखरा'... गतःकाल विसरून... भविष्याकडे झेपावण्यासाठी...!!                 -Ek प्रियकर

love u ताई...!

स्वभाव तुझा खूपच प्रेमळ... पण जरा हळवाच असलेला... खूपच मुडी आणि... रागाचा पारा जवळच असलेला...! जाशील जेव्हा तु... आपल्या हक्काच्या घरी .. ओठावर हसू मनी आनंद... अन् येईल पाणी नयनांच्या दारी....                          -Ek प्रियकर

तुझा दोष नाही...!

उदास उदास वाटा... तुझा दोष नाही... बंबाळलेला काटा... तुझा दोष नाही... सोडली साथ पावलाने गावात तुझ्या... चाललो मी एकटा... तुझा दोष नाही...                                    -Ek प्रियकर