शिकवं थोडं मलाही...
प्रेम व्यक्त करावं कसं...!
अबोल राहूनही...
डोळ्यांनी बोलावं कसं...!!
प्रेम व्यक्त करावं कसं...!
अबोल राहूनही...
डोळ्यांनी बोलावं कसं...!!
गुंतूनही मनानं.
गुंतणार नाही सांगाव कसं...!
न पाठ फिरल्यावर...
साद घालावं कसं...!!
गुंतणार नाही सांगाव कसं...!
न पाठ फिरल्यावर...
साद घालावं कसं...!!
फक्त एका कटाक्षान...
वेड लावावं कसं...!
हळूच गोड हसून...
मनास फसवाव कसं...!!
न बोलता कुणाच...
हृदय जिंकाव कसं...!
चोर पावलांनी...
हृदयात शिराव कसं...!!
कुणाला वेड लावून...
त्यास झुरवाव कसं...!
कुणी प्रेमात डुंबल्यावर...
आयुष्यातून निघाव कसं...!!
-Ek प्रियकर
www.ekpriyakar.blogspot.com
Comments
Post a Comment