Skip to main content

Posts

Showing posts from September, 2015

तुला काय फरक पडतो...!

तुझ्याशी बोललो काय... आणि नाही बोललो काय...।।१।। तुला भेटलो काय... आणि नाही भेटलो काय...।।२।। मी जगलो काय... नि मेलो काय... तसही तुला काय फरक पडतो...।।३।।                         -Ek प्रियकर

DJ च्या गोंगाटात... दहीहंडीला मजा ती काय...?

खरसई माझी माय... मुंबई तर मावशीच हाय... DJ च्या गोंगाटात... दहीहंडीला मजा ती काय...??? जन्म अष्टमी केली मुंबईत... दहिकालेचा आंनद मात्र... माय तुझ्याच पदराशी हाय... सांगा DJ च्या गोंगाटात... दहीहंडीला मजा ती काय... कधी उभी तं कधी ऊपरी... आमची बारी भी दोन तऱ्हे ची हाय... DJ च्या गोंगाटात... दहीहंडीला मजा ती काय.. कुणी नवसानी तं कुणी हावसानं बांधलेली.... फोडण्यासाठी बाल गोपालांचा मेलाच भरलाय... सांगा बर DJ च्या गोंगाटात... दहीहंडीला मजा ती काय... हांडी तल्या धया बरोबरोबर.... सूटाऱ्याची मजा वेगलीच हाय... DJ च्या गोंगाटात... दहीहंडीला मजा ती काय.. खरसईची गोयंदा म्हणजे संस्कृतीचा शृंगार.. अन् लोकगीतांचा जागर हाय... DJ च्या गोंगाटा पेक्षा... ढोलाचा ठेक्याची अन् सनई चे सुरांची मजाच निराली हाय...                                 -मी खरसईकर                            भावेश जनार्दन म्हसकर (Ek प्रियकर)

चार शब्दात काय मांडू... या ईश्वराची काया...

शिक्षक आणी विद्यार्थी... यांत एक वेगळच नात... उजाडणाऱ्या दिवसागनीक... ते आणखी उलगडत जात... शिक्षक म्हणजे... आदर्शाचा धड़ा... ग्रीष्मातही फुले जो... गुलमोहराचा सड़ा... कधी मार्गदर्शन... कधी धड़ा तत्वज्ञान... ऐकून किर्ती शिष्याची... फुलतो उरी अभिमान... असता शिरावर हात गुरुचा... जीवन घेई सही आकर... गुरुच आहे... यशश्वी जीवनाचा आधार... चार शब्दात काय मांडू... या इश्वराची काया... कड़क उन्हातही देती प्रेमळ छाया... अशीच आहे... अतुल्य यांच्या ज्ञानाची माया... इथून पुढे एक मात्र नक्की होईल... आयुष्याच्या प्रवासात मागे वळून पाहता... आठवण मात्र तुमची येईल... शिक्षकहो... तुम्हच्या मुळेच... खरी दुनिया पाहिली... आयुष्याच्या या वळणावर... प्रियकराने... ही शब्दसुमने तुमच्यासाठी वाहिली...                                              -Ek प्रियकर                                             ०५/०९/२०१५