खरसई माझी माय... मुंबई तर मावशीच हाय...
DJ च्या गोंगाटात... दहीहंडीला मजा ती काय...???
जन्म अष्टमी केली मुंबईत...
दहिकालेचा आंनद मात्र... माय तुझ्याच पदराशी हाय...
सांगा DJ च्या गोंगाटात... दहीहंडीला मजा ती काय...
कधी उभी तं कधी ऊपरी...
आमची बारी भी दोन तऱ्हे ची हाय...
DJ च्या गोंगाटात... दहीहंडीला मजा ती काय..
कुणी नवसानी तं कुणी हावसानं बांधलेली....
फोडण्यासाठी बाल गोपालांचा मेलाच भरलाय...
सांगा बर DJ च्या गोंगाटात... दहीहंडीला मजा ती काय...
हांडी तल्या धया बरोबरोबर....
सूटाऱ्याची मजा वेगलीच हाय...
DJ च्या गोंगाटात... दहीहंडीला मजा ती काय..
खरसईची गोयंदा म्हणजे संस्कृतीचा शृंगार..
अन् लोकगीतांचा जागर हाय...
DJ च्या गोंगाटा पेक्षा...
ढोलाचा ठेक्याची अन् सनई चे सुरांची मजाच निराली हाय...
-मी खरसईकर
भावेश जनार्दन म्हसकर (Ek प्रियकर)
Comments
Post a Comment