Skip to main content

Posts

Showing posts from July, 2015

आशा....

पाऊस... कधीच का बरसत नाही... एखादा रंग घेऊन...? कधी हिरवा कधी भगवा... तर कधी निळा होऊन... कारण पाऊस कधीच देत नाही... जात, धर्म, पंथ या वात्रट गोष्टिना थारा... पाऊस म्हणजे निखळ आनंद... अन् झोंबनारा गार वारा.... पाऊस बरसतो... निर्मळ, स्वछ, आनंदी... नेसवतो हिरवी शाल मातीला... अन् देतो एक वेगळीच शिकवण ... या मानव जातीला... पण काही चांगल शिकेल... तो माणूसच कसा...? ओरबाडण्याची वृत्ती त्याची... कृत्य दर्शविती आहेच दानव जसा...! मित्रहो... पाऊस खुप कही  शिकऊन जातो... आपल अस्तित्व मीटवुण... इतरांसाथी जगण्याची प्रेरणा देतो... कितीही वादळ निर्माण झाले... लागल्या कितीही जाती धर्माच्या सरी... तरीही जगाल प्रेमाच्या भाषेवर... या प्रियकरची रचना संपते..  या एकाच आशेवर....                               -Ek प्रियकर                              १७.०७.२०१५ रंग आषाढाचे २०१५ रोहा येथे झालेल्या कार्यक्रमात मी (Ek प्रियकर)  ने सादर केलेली कविता... कवितेच शीर्षक को.म.सा.प ठाणे अध्यक्षांनी सुचवल आहे....

जगतोय... तू परतशिल या आशेवर...!

दोन थेंब शिंपडल्याने... कुणाची तहान... भागलीच न्हाई...! मुटभर दाण्यासाठी... इतभर जमीन गहाण राही....!! घोटभर पाण्यासाठी ... जीव हा व्याकुळ होई....! थेंबावीन पाण्याच्या... फुटलेला अंकुर ही करपुन जाई...!! तुझ्या अश्या रूसव्यान... दुबार पेरणीच संकट येई...! आधीच जगण होत असाह्य... आता अजुनच बिकट होई...!! बरस रे वसंता... नको काळजास घोर लावु...! कोमेजल्या फुलास या... नको उन्हाचे आणिक चटके देऊ....!! नको वागुस (बिनकाळजाच्या) नेत्यासरखा... वेळ काढून घटकाभर येऊन जा... भीकाऱ्याच्या ओंजळीत या... मायेचा ओलावा देऊन जा... सांग तू बरसशिल ना...? पुन्हा एकदा निवांत...! अन् अशांत, दुःखी मनास या.... करशील ना शांत....? जगतोय... तू परतशील या आशेवर.... -Ek प्रियकर

क्षण तुझ्या सोबतीतला....!

प्रत्येक क्षण आठवतो तुझ्या सोबतीतला...! प्रत्येक क्षण असा कि लाजवेल तो सुखाला....!!            -Ek प्रियकर

सखे पापण्या माझ्या भिजल्याच नाही....

सखे पापण्या माझ्या भिजल्याच नाही... तुझ्यासाठी पाकळ्या कुजल्याच नाही....! रंग गुलाबी अजुनही सांगतो... शब्दांच्या सहवासत राडायचं नाही...!!                             -Ek प्रियकर

माझं पोरंग बी त्याच शाळेत जातं...!!

मालवणी तील प्राइवेट स्कूल वर पडणाऱ्या हतोड्या मुले पालकांची अवस्था मांडण्याचा प्रयत्न माझ्या शब्दात मी केला आहे... BMC शाळा आणि तिची अवस्था... मी माझ्या डोळ्यांनी पहिलं होतं...! पोटाची खळगी अर्धी भरून... त्याले प्राइवेट शाळेत घातल होतं...!! मंत्रीसाहेब थोडस ध्यान इथ बी दया... माझं पोरंग बी त्याच शाळेत जातं...!! भ्रष्ट अधिकाऱ्या मुळच... अनधिकृत बांधकाम वाढत होतं...! न्यायालयाने धाडलेल्या एका कगदान... आमच्या पोरांच आयुष्य मात्र उध्वस्त होत...!! मंत्रीसाहेब थोडस ध्यान इथ बी दया... माझं पोरंग बी त्याच शाळेत जातं...!! पोरंग शिकुन खुप-खुप मोठ्ठ होईल... अस स्वप्नं उराशी बाळगल होतं...! पण तूटणाऱ्या शाळेबरोबर... माझ आन् त्याचही स्वप्नं तुटत जातं...!! मंत्रीसाहेब थोडस ध्यान इथ बी दया... माझं पोरंग बी त्याच शाळेत जातं...!! _/\_ -Ek प्रियकर

तुझ्यात हरवलेला मी...!

तुझ्यापासुन सुरु होउन तुझ्यातच संपलेला मी...! माझे मीपण हरवून......  तुझ्यात हरवलेला मी...!!                                            -Ek प्रियकर

"" साथ तुझी ""

दिवस येतील खडतर... प्रत्येक क्षणात मला पहा...! विश्वासाच्या ह्या बंधनाला... आजन्म साथ देत रहा...!!               -Ek प्रियकर