Skip to main content

ओलांडून बंधनांचा उंबरा पुढे तू जायला हवे...

८ मार्च जागतिक महिला दिन निमित्त 
"भावेश जनार्दन म्हसकर" (Ek प्रियकर) ची ही 
शब्द सुमने सगळ्या महिला वर्गास समर्पित...

तुझ्या स्वप्नांना बळ, आता तूच द्यायला हवे...
ओलांडून बंधनांचा उंबरा पुढे तू जायला हवे... ॥ ध्रु ॥

मदतीचा हात देणारे असतील कमी..
अन् पाय खेचणारेच मिळतील जास्त...
त्यांचे मनसूबे तू ठेचुन काढायला हवे...
कुणाच्या साथीने अथवा एकटिने आता तू पुढे व्हायला हवे ॥१॥


पुन्हा एकदा एखादया सुनीताने
जन्म घ्यायला हवे...
बलात्कार करणाऱ्या नाराधमाला...
कठोर शिक्षा तूच करायला हवे...   ॥२॥


सरस्वती च्या सोबतीने...
तूला माहाकली चे रूपही घ्यायला हवे...
अन् तुला अडवणाऱ्या वृत्तिला
तूच छाटायला हवे... ॥३॥


तुझ्या पवित्र्याच प्रमाणपत्र मागणाऱ्या रामाला...
आजची सीता होऊन तुही जाब विचारयला हवे...
अन् पवित्र बंधनात अडकल्यावर मात्र...
राधा कृष्णा सारखे जागायल हवे... ॥४॥


जपून परंपरा... मोडून जुनाट बंधने...
फुलबरोबर कळीलाही तुला जपायला हवे...
झाशीची राणी म्हणून जगताना...
शिवबाही तू घडवायला हवे...
अन् जगताना आजच्या घडिला...
स्वप्न पूर्तिच्या दिशेने तू एक पाऊल टाकायला हवे... ॥५॥

                                 © Ek प्रियकर
                                ९०२९५०८९०७
                          मु.पो. खरसई, जि. रायगड 

Comments

Popular posts from this blog

।।...शाळेच्या आठवणी आणि मन माझ...।।

वाटे वरुण जाता शाळेच्या... जाग्या झाल्या जुन्या आठवणी... थांबली पाउले आणि शाळेचे दिवस आले ध्यानी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... गेलो थेट आत अन् सारच घेतल पाहून... आणि पुन्हा एकदा गेलो शाळेचाच होऊन... आठवल सार... समूह गीत प्राथना, पसायदान... अन् ओठावर आली मंजुळ गाणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी...!! केली पुन्हा एकदा तशीच मस्ती... केला थोडा दंगा... पण... ओरडणार नव्हतच कोणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... पहिला तोच वर्ग... अन् अनुभवाला पुन्हा एकदा स्वर्ग.... बसलो नेहमीच्याच जगी... पण शिकवणार नव्हतच कुणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी.... मग पुन्हा एकदा... बसाव वाटलं... त्याच कट्ट्यावर... अन् जागविल्या आठवणी... नकळत डोळ्यात आलं पाणी... अन् पुन्हा एकदा दाटून आल मनी.... आठवणींनी ताब घेतला होता मनावर... आले उन्हाचे कवडसे अन् आलो भानावर... एक विनंती... भेटून सारे जागवू शाळेच्या आठवणी... अन् ते क्षण सारे आनंदी साठवू मनी...!!                                       -Ek प्रियकर

एकतर्फी प्रेम...!

स्वत:लाच फसवतो मी नव-नवीन स्वप्ने पाहून, प्रेम हि का मिळवावे लागते आजकाल भिक मागून ... रममाण ती स्वत:च्याच विश्वात परवा न तीस कसलीही, मग मीच का वेडापिसा तीच्यासाठी असा… विचार करून अखेर काहीच उपयोग नव्हता, तो वर बसलेला भगवंत सगळी सूत्रे हलवत होता … एकतर्फी प्रेम केलं हा का झाला माझा गुन्हा, देवा नको ना आणूस अश्या व्यक्तींना आयुष्यात पुन्हा … -Ek प्रियकर

तुझे सुंदर अन् निरागस डोळे ...!!

!!... तुझे सुंदर अन् निरागस डोळे ...!! मी तुझ्या मौनात माझे उत्तरे शोधून गेलो..., बोलले डोळे तुझे अन् सार मी जाणून गेलो..., बावल्या प्रश्नास होती , गोड ओठांची अपेक्षा..., मी तुझ्या डोळ्यात सारी अक्षरे वाचून गेलो... मोहिनी तव लोचनांची काय सांगावी तुला मी...? पापण्यांच्या आत तुझिया , मीच सामावून गेलो...! •♥• Ek प्रियकर... •♥•