#पाऊस
आलो आहे आता मी....
आलो आहे आता मी,
मनसोक्त भिजून घे,
पुन्हा लिही कविता माझ्यावर,
हातात ती लेखणी घे...!
कोसळत्या सरींबरोबर,
भाजक्या मक्याचा आस्वाद घे,
छत्री दे भिरकावून,
अन् हवं तेवढं बागडून घे...!
चिखलातून चालताना,
पँट थोडी सावरून घे,
घरी पोहोचायला उशीर होईल,
रेल्वेचं कोलमडणं सांभाळून घे...!
पुन्हा मी निघून जाईन,
हवं तेवढं ओंजळीत भरून घे,
वर्षभर साठवून ठेवायचंय तूला,
आज मात्र थोड्यावरंच भागवून घे...!
-Ek प्रियकर
www.ekpriyakar.blogspot.com
वाटे वरुण जाता शाळेच्या... जाग्या झाल्या जुन्या आठवणी... थांबली पाउले आणि शाळेचे दिवस आले ध्यानी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... गेलो थेट आत अन् सारच घेतल पाहून... आणि पुन्हा एकदा गेलो शाळेचाच होऊन... आठवल सार... समूह गीत प्राथना, पसायदान... अन् ओठावर आली मंजुळ गाणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी...!! केली पुन्हा एकदा तशीच मस्ती... केला थोडा दंगा... पण... ओरडणार नव्हतच कोणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... पहिला तोच वर्ग... अन् अनुभवाला पुन्हा एकदा स्वर्ग.... बसलो नेहमीच्याच जगी... पण शिकवणार नव्हतच कुणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी.... मग पुन्हा एकदा... बसाव वाटलं... त्याच कट्ट्यावर... अन् जागविल्या आठवणी... नकळत डोळ्यात आलं पाणी... अन् पुन्हा एकदा दाटून आल मनी.... आठवणींनी ताब घेतला होता मनावर... आले उन्हाचे कवडसे अन् आलो भानावर... एक विनंती... भेटून सारे जागवू शाळेच्या आठवणी... अन् ते क्षण सारे आनंदी साठवू मनी...!! -Ek प्रियकर
Comments
Post a Comment