पाणावलेले डोळे माझे...
मी कित्येकदा तुझ्यापासून लपवले होते...
पाहताच चेहरा माझा...
तू अचूक ओळखले होते...
चूक असता माझी...
तू खुपदा मारल होत...
मग बसून जवळ...
मायेने मिठीत तू धरल होत...
प्रत्येक वेळी मायेने हात...
डोक्यातून फिरवायची...
शाळेत जाण्या आधीच...
बाराखडी गिरवायची...
मला काही होता...
तू वेड्यासारखी वागतेस...
उपाशी पोटी रात्रभर...
माझ्या उशाशी जागतेस...
तुझ्या साहवासात कित्येक...
बड़बड़ गीत आपण गायली होती...
अन् देवळतली प्रत्येक मुर्ती मी...
तेव्हाच तुझ्यात पाहिली होती...
प्रत्येक क्षणी...
असावे सोबत आपण...
हीच एक मनी इच्छा...
मातृ दिनाच्या खुप खुप शुभेच्छा...
©भावेश जनार्दन म्हसकर
९०२९५०८९०७
Comments
Post a Comment