काय ते प्रेम त्या शहरातल्या हिरोचं...
अन काय हे प्रेम आम्हा खेड्यातल्या पोरांचं..
त्याचं प्रेम म्हणजे त्याने
तिला दिलेलं पहिल- वहिल ग्रेटिंग..
अन आमच हे पिरेम म्हंजी
शेजारच्या बाळ्यान लावून दिलेली सेटिंग..
त्याचं ते प्रेम म्हणजे
दोन पाखरांची गोड गुलाबी मजा..
अन आमच हे पिरेम म्हंजी
साऱ्या गावभर झालेला गाजावाजा..
त्याचं ते प्रेम म्हणजे
चौपाटीवाल्या फाईव्हस्टार मध्ये डेट..
अन आमच हे पिरेम म्हंजी
गावच्या बंधाऱ्यावरची पाच मिनटाची भेट...
पण त्याचं ते प्रेम म्हणजे चार
दिवसात होणारा ब्रेकअप...
अन आमच हे पिरेम म्हंजी
आयुष्यभर चालणारा सेटअप...
•♥• Ek प्रियकर... •♥•
वाटे वरुण जाता शाळेच्या... जाग्या झाल्या जुन्या आठवणी... थांबली पाउले आणि शाळेचे दिवस आले ध्यानी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... गेलो थेट आत अन् सारच घेतल पाहून... आणि पुन्हा एकदा गेलो शाळेचाच होऊन... आठवल सार... समूह गीत प्राथना, पसायदान... अन् ओठावर आली मंजुळ गाणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी...!! केली पुन्हा एकदा तशीच मस्ती... केला थोडा दंगा... पण... ओरडणार नव्हतच कोणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... पहिला तोच वर्ग... अन् अनुभवाला पुन्हा एकदा स्वर्ग.... बसलो नेहमीच्याच जगी... पण शिकवणार नव्हतच कुणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी.... मग पुन्हा एकदा... बसाव वाटलं... त्याच कट्ट्यावर... अन् जागविल्या आठवणी... नकळत डोळ्यात आलं पाणी... अन् पुन्हा एकदा दाटून आल मनी.... आठवणींनी ताब घेतला होता मनावर... आले उन्हाचे कवडसे अन् आलो भानावर... एक विनंती... भेटून सारे जागवू शाळेच्या आठवणी... अन् ते क्षण सारे आनंदी साठवू मनी...!! -Ek प्रियकर
nice one bro
ReplyDelete