इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत...
अन् पारिजातकाचा वास आहे...
आपल्या तरुणाईमध्ये बरच काही खास आहे...!
मी म्हणजे जीवन...
अन् तुम्हि म्हणजे श्वास आहे...
आपल्या तरुणाईमध्ये बरच काही खास आहे...!
संकटांची नाही भिती...
तुमच्या मैत्रीचा विश्वास आहे...
आपल्या तरुणाईमध्ये बरच काही खास आहे...!
कधी वाटते तुमची मैत्री तेवढी सच्ची...
बाकी दुनिया नुसता आभास आहे...
आपल्या तरुणाईमध्ये बरच काही खास आहे...!
हवे काय अजुनि त्याला...
आधार तुमच्यासम ज्यास आहे....
आपल्या तरुणाईमध्ये बरच काही खास आहे...!
-Ek प्रियकर
Comments
Post a Comment