बनायच असेलच कही...
तू झरा हो माणुसकीचा...
जमेल तसा वाहत जा..
मनामनात राहत जा...
बनायचं असेलच कही...
तर तू वारा बन..
गंध विचारांचा पेरत जा...
दुसर्यांसाठी सरत जा...
बनायचं असेलच कही...
तर तू बन घन काळा
मनमुराद बरसत जा..
स्व:तसाठी नाही..दुनियेसाठी तरसत जा...
व्हायचं असेलच कही...
तर कधी तू सुर्यही हो..
मान्य आहे, तू जळशील..
पण दुसर्यांसाठी तू वरदान ठरशील..
नाहीच जमलं काही तर
तर तू वाळलेल्या झाडाची काठी हो...
कुणा एखाद्याच्या आधाराची लाठी हो...
-Ek प्रियकर
www.ekpriyakar.blogspot.com
Comments
Post a Comment