Skip to main content

बलात्कार...

              बलात्कार...
प्रत्येक नव्या दिवशी, प्रत्येक क्षणी...
             कुठे ना कुठे...
   कधी दिल्ली , तर कधी मुंबई...
   ना जाणे अजून कुठे कुठे...
   जणू स्पर्धाच सुरु केलीय...
कोण किती जखमा देईल याची...?

आणि मग चर्चा सुरु होतील...
       सोशल मीडिया वर...
फ्रंट पेज बातमी होईल कित्येक पेपरांसाठी...
    आणि मग काही लोक आहेतच...
        पुन्हा तयार करायला...
         बलात्कार....

उतरवून घेतील शब्दन शब्द...
  तिच्यावरच्या अत्याचाराचा...
लावून टाकतील एखाद्या असह्य...
     नग्न देहाचा फोटो...

काढतील एखादा निषेध मोर्चा...
   कुठलासा झेंडा हातात घेऊन...
आणि जमलच तर देऊन टाकतील...
   तिथेही रंग एखाद्या जातीचा...

मिळतील खूप सारे लाईक्स अन् कंमेंट्स...
  अन् मग दबली जाईल हि पोस्ट हि...
       एखाद्या नव्या विषयाखाली...
       मग हाही विषय जुना होईल...
पण ते मात्र अजूनही मोकाटच असतील...
      पुन्हा एखाद्या बलात्कारासाठी...

पण हे दुःख, वेदना अन् असह्यता...
     अजूनच वाढत जाईल...

बदलत्या पिढीबरोबर... काळानुसार
     होत राहतील बलात्कार...
      बलात्कारावर बलात्कार...
       अजून एक बलात्कार....
आणि मग अजून एक बलात्कार...
  चौका चौका मध्ये होत राहतील...
फक्त... बलात्कार आणि बलात्कार...

फक्त तिच्या देहाचा नाही...
स्त्रीचा, तिच्या स्त्रीत्वा चा...
प्रत्येक कोवळ्या मनावर होत असेल...
          बलात्कार

                  ✍भावेश जनार्दन म्हसकर
                         ९०२९५०८९०७
                   मु. पो. खरसई जि. रायगड 
www.ekpriyakar.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

।।...शाळेच्या आठवणी आणि मन माझ...।।

वाटे वरुण जाता शाळेच्या... जाग्या झाल्या जुन्या आठवणी... थांबली पाउले आणि शाळेचे दिवस आले ध्यानी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... गेलो थेट आत अन् सारच घेतल पाहून... आणि पुन्हा एकदा गेलो शाळेचाच होऊन... आठवल सार... समूह गीत प्राथना, पसायदान... अन् ओठावर आली मंजुळ गाणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी...!! केली पुन्हा एकदा तशीच मस्ती... केला थोडा दंगा... पण... ओरडणार नव्हतच कोणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... पहिला तोच वर्ग... अन् अनुभवाला पुन्हा एकदा स्वर्ग.... बसलो नेहमीच्याच जगी... पण शिकवणार नव्हतच कुणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी.... मग पुन्हा एकदा... बसाव वाटलं... त्याच कट्ट्यावर... अन् जागविल्या आठवणी... नकळत डोळ्यात आलं पाणी... अन् पुन्हा एकदा दाटून आल मनी.... आठवणींनी ताब घेतला होता मनावर... आले उन्हाचे कवडसे अन् आलो भानावर... एक विनंती... भेटून सारे जागवू शाळेच्या आठवणी... अन् ते क्षण सारे आनंदी साठवू मनी...!!                                       -Ek प्रियकर

एकतर्फी प्रेम...!

स्वत:लाच फसवतो मी नव-नवीन स्वप्ने पाहून, प्रेम हि का मिळवावे लागते आजकाल भिक मागून ... रममाण ती स्वत:च्याच विश्वात परवा न तीस कसलीही, मग मीच का वेडापिसा तीच्यासाठी असा… विचार करून अखेर काहीच उपयोग नव्हता, तो वर बसलेला भगवंत सगळी सूत्रे हलवत होता … एकतर्फी प्रेम केलं हा का झाला माझा गुन्हा, देवा नको ना आणूस अश्या व्यक्तींना आयुष्यात पुन्हा … -Ek प्रियकर

तुझे सुंदर अन् निरागस डोळे ...!!

!!... तुझे सुंदर अन् निरागस डोळे ...!! मी तुझ्या मौनात माझे उत्तरे शोधून गेलो..., बोलले डोळे तुझे अन् सार मी जाणून गेलो..., बावल्या प्रश्नास होती , गोड ओठांची अपेक्षा..., मी तुझ्या डोळ्यात सारी अक्षरे वाचून गेलो... मोहिनी तव लोचनांची काय सांगावी तुला मी...? पापण्यांच्या आत तुझिया , मीच सामावून गेलो...! •♥• Ek प्रियकर... •♥•