Skip to main content

येण्याआधी सगळ्यांना नोटिस धाड... _/\_

नमस्कार मित्रहो मी, भावेश म्हसकर (Ek प्रियकर)
आज जरा वेगळ्या विषयावर कविता लिहिण्याचा
प्रयत्न केलाय... कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही...
तुमच्या सुचनांच स्वागत आहेच....
माझ्या इतर कवितांप्रमाणे हि देखील तुमच्या पसंतीस उतरेल....
देवा खरंच तुला नाही जमत का रे...
स्वतःला छोट्या आकारात सामावून घेणं...?
कि तुझं वास्तव्यच आहे...
फक्त पंचवीस-तीस फुटांच्या मूर्तीत...???
जरा कमी रोषणाई केली...
तर तू आम्हाला...
दिसणारच नाहीस का...???
कि तुलाही भीती वाटते...
त्या गर्द काळ्या कुट्ट अंधाराची...???
कसं मॅनेज करतोस रे...
एकटा एवढं सगळं...
कसा राहतोस एकाच वेळी हजर..
एवढ्या ठिकाणी...???
इतकं सोप्प आहे का रे तेही...
एकाच USER ने एकाच वेळी...
FB, TWITTER, GOOGLE...
हँडल करावं....?
तू तर सर्वत्र आहेस ना...
मग काही ठिकाणी तू नवसाला पावतोस...
तर काही ठिकाणी नाही...
असं का...????
कि तुलाही पडतात रोमिंग चार्जेस...
कि तुझीहि होत रे नेटवर्क गुल्ल काही वेळा...
देवा माझीहि तुझ्यावर अपार श्रद्धा आहे...
दृढ विश्वास हि आहे....
आता फक्त एवढंच कर...
पुढच्या वर्षी....येण्याआधी....
मंडळांना/ भक्तांना... परंपरेची NOTICE धाड...
अन् त्यांनाही.. आपल्या पारंपरिक उत्सवाच्या प्रेमात पाड....
                                        ✒भावेश जनार्दन म्हसकर
                                            ९०२९५०८९०७
                                              खरसई, रायगड
www.ekpriyakar.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

।।...शाळेच्या आठवणी आणि मन माझ...।।

वाटे वरुण जाता शाळेच्या... जाग्या झाल्या जुन्या आठवणी... थांबली पाउले आणि शाळेचे दिवस आले ध्यानी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... गेलो थेट आत अन् सारच घेतल पाहून... आणि पुन्हा एकदा गेलो शाळेचाच होऊन... आठवल सार... समूह गीत प्राथना, पसायदान... अन् ओठावर आली मंजुळ गाणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी...!! केली पुन्हा एकदा तशीच मस्ती... केला थोडा दंगा... पण... ओरडणार नव्हतच कोणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... पहिला तोच वर्ग... अन् अनुभवाला पुन्हा एकदा स्वर्ग.... बसलो नेहमीच्याच जगी... पण शिकवणार नव्हतच कुणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी.... मग पुन्हा एकदा... बसाव वाटलं... त्याच कट्ट्यावर... अन् जागविल्या आठवणी... नकळत डोळ्यात आलं पाणी... अन् पुन्हा एकदा दाटून आल मनी.... आठवणींनी ताब घेतला होता मनावर... आले उन्हाचे कवडसे अन् आलो भानावर... एक विनंती... भेटून सारे जागवू शाळेच्या आठवणी... अन् ते क्षण सारे आनंदी साठवू मनी...!!                                       -Ek प्रियकर

एकतर्फी प्रेम...!

स्वत:लाच फसवतो मी नव-नवीन स्वप्ने पाहून, प्रेम हि का मिळवावे लागते आजकाल भिक मागून ... रममाण ती स्वत:च्याच विश्वात परवा न तीस कसलीही, मग मीच का वेडापिसा तीच्यासाठी असा… विचार करून अखेर काहीच उपयोग नव्हता, तो वर बसलेला भगवंत सगळी सूत्रे हलवत होता … एकतर्फी प्रेम केलं हा का झाला माझा गुन्हा, देवा नको ना आणूस अश्या व्यक्तींना आयुष्यात पुन्हा … -Ek प्रियकर

तुझे सुंदर अन् निरागस डोळे ...!!

!!... तुझे सुंदर अन् निरागस डोळे ...!! मी तुझ्या मौनात माझे उत्तरे शोधून गेलो..., बोलले डोळे तुझे अन् सार मी जाणून गेलो..., बावल्या प्रश्नास होती , गोड ओठांची अपेक्षा..., मी तुझ्या डोळ्यात सारी अक्षरे वाचून गेलो... मोहिनी तव लोचनांची काय सांगावी तुला मी...? पापण्यांच्या आत तुझिया , मीच सामावून गेलो...! •♥• Ek प्रियकर... •♥•