Skip to main content

शुभेच्छा..वाढदिवस...वैगेरे..

खरंतर रोजच्या सारखाच दिवस, वाढदिवस आहे म्हणजे खूप काही विशेष आहे, हे आजवर मी कधी मानलच नाही. रोजच्या सारखाच हाही माझ्यासाठी सामान्य दिवस, मुळात आयुष्यातील एक दिवस/वर्ष कमी झालं ते का सेलिब्रेट करायचं??? अस मी मानतो. पण तुमच्या सारखे मित्र आयुष्यात आहेत जे हा दिवस सेलिब्रेट करतात कारण याच दिवसामुळे मी त्यांच्या आणि ते माझ्या आयुष्यात आले. खरंतर तुमच्या प्रेमाचं वर्णन शब्दात करणं शक्यच नाही. Facebook, Whatsapp, Twitter, Gmail, Call ज्या ज्या प्रकारे तुम्हाला शक्य होत त्या प्रकारे तुम्ही माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलात. खरंच खूप भाग्यवंत आहे मी जी तुमची साथ मला लाभली आहे...
पुढेही तुमचे आशिर्वाद अन प्रेम असंच मिळत राहोत हीच इच्छा...
आणि हल्ली कविता लिहिणं बंद केलंस का...?
असं विचारणाऱ्या मित्रांसाठी, आजपासून रोज एक कविता ब्लॉग वर पोस्ट करत जाईन...☺
आणि गडबडीत प्रत्येकाला केला असेल नसेल, गोड मानून घ्या... आणि सदैव साथ द्या...
                             तुमचाच,
                    भावेश जनार्दन म्हसकर
                       अर्थात Ek प्रियकर...
www.ekpriyakar.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

एकतर्फी प्रेम...!

स्वत:लाच फसवतो मी नव-नवीन स्वप्ने पाहून, प्रेम हि का मिळवावे लागते आजकाल भिक मागून ... रममाण ती स्वत:च्याच विश्वात परवा न तीस कसलीही, मग मीच का वेडापिसा तीच्यासाठी असा… विचार करून अखेर काहीच उपयोग नव्हता, तो वर बसलेला भगवंत सगळी सूत्रे हलवत होता … एकतर्फी प्रेम केलं हा का झाला माझा गुन्हा, देवा नको ना आणूस अश्या व्यक्तींना आयुष्यात पुन्हा … -Ek प्रियकर

।।...शाळेच्या आठवणी आणि मन माझ...।।

वाटे वरुण जाता शाळेच्या... जाग्या झाल्या जुन्या आठवणी... थांबली पाउले आणि शाळेचे दिवस आले ध्यानी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... गेलो थेट आत अन् सारच घेतल पाहून... आणि पुन्हा एकदा गेलो शाळेचाच होऊन... आठवल सार... समूह गीत प्राथना, पसायदान... अन् ओठावर आली मंजुळ गाणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी...!! केली पुन्हा एकदा तशीच मस्ती... केला थोडा दंगा... पण... ओरडणार नव्हतच कोणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी... पहिला तोच वर्ग... अन् अनुभवाला पुन्हा एकदा स्वर्ग.... बसलो नेहमीच्याच जगी... पण शिकवणार नव्हतच कुणी... आणि पुन्हा एकदा दाटून आल मनी.... मग पुन्हा एकदा... बसाव वाटलं... त्याच कट्ट्यावर... अन् जागविल्या आठवणी... नकळत डोळ्यात आलं पाणी... अन् पुन्हा एकदा दाटून आल मनी.... आठवणींनी ताब घेतला होता मनावर... आले उन्हाचे कवडसे अन् आलो भानावर... एक विनंती... भेटून सारे जागवू शाळेच्या आठवणी... अन् ते क्षण सारे आनंदी साठवू मनी...!!                                       -Ek प्रियकर

तुझे सुंदर अन् निरागस डोळे ...!!

!!... तुझे सुंदर अन् निरागस डोळे ...!! मी तुझ्या मौनात माझे उत्तरे शोधून गेलो..., बोलले डोळे तुझे अन् सार मी जाणून गेलो..., बावल्या प्रश्नास होती , गोड ओठांची अपेक्षा..., मी तुझ्या डोळ्यात सारी अक्षरे वाचून गेलो... मोहिनी तव लोचनांची काय सांगावी तुला मी...? पापण्यांच्या आत तुझिया , मीच सामावून गेलो...! •♥• Ek प्रियकर... •♥•